MTDC च्या माध्यमातून पर्यटकांसाठी दिवाळीनिमित्त अनोखी पर्वणी ...
महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाकडुन पर्यटकांसाठी दिपोत्सवाची अनोखी पर्वणी.... महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाची पर्यटक निवासे 100 टक्के फुल होणार…. प्रत्येक प्रांताच्या लोकसंस्कृतीबाबत पर्यटकांच्या मनामध्ये प्रचंड उत्सुकता असते. सांस्कृतिक कार्यक्रमांच्या माध्यमातुन तसेच वेगवेगळया लोकरुचक लोककला यांव्दारे पर्यटकांना आनंद दिल्यास पर्यटन व्यवसाय निश्चित बहरतो. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाव्दारे एकुण 30 निवासे व उपहारगृह यांचे परिचलन होत आहे. महामंडळाच्या कर्मचारी वर्गाने आजवर घेतलेल्या आणि घेत असलेल्या अथक प्रयत्नांमुळेच आज महामंडळाची ख्याती साऱ्या भारतभर पसरली आहे. केवळ महाराष्ट्रतुनच न्हवे तर देशभरातुन असंख्य अतिथी पर्यटक निवासामध्ये वास्तव्यास येत असतात. ‘अतिथी देवो भव’ या नीतीचा अवलंब करत येणाऱ्या पर्यटकांना निवासामधील कर्मचाऱ्यांव्दारे उत्तम सोइसुविधा पुरविल्या जातात. बेधुंद पावसाने चिंब भिजत वर्षा पर्यटन अनुभव घेण्यास चुकलेल्या पर्यटकांसाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ घेवुन येत आहे दिपोत्सवाचा अनोखा क्षण.... आगामी दिपावलीचा उत्सव आणि गुलाबी थंडी मध्ये खाशा पर्