क्रांतीज्योती व आपल्या मैत्रिणी संस्थेचा आदिवासी पाड्यात दिवाळी निमित्त आनंदाचा दिवा .....
आदिवासी पाड्यात क्रांतीज्योती ची दिवाळी
पुणे प्रतिनिधी:- क्रांतीज्योती महिला विकास संस्थातर्फे मुळशी तालुक्यातील बेलवडे या आदिवासी पाड्यात कपडे,खेळणी,मिठाई, आकाशकंदील देवून दिवाळी आनंदात साजरी करण्यात आली.
खरंच आपली दिवाळी खऱ्या अर्थाने आनंदी होते का? की फक्त परिवारापुरतं?,आपल्या मुलांपुरतं? आणि आपल्यापुरतं? सगळ कसं मर्यादित जग असतं, पण थोडसं वेगळं जगून पाहिलं तर,म्हणजेच दुसऱ्यांच्या आनंदात आपण आनंद मानला तर,हीच खूप मोठी,महत्त्वाची गोष्ट आहे.
जे वाटलं तेच लिहण्याचा प्रयत्न असतो.अशी दिवाळी म्हणजे खऱ्या अर्थाने साजरी होणारी दिवाळी.आदिवासी वंचित भागातील त्या लोकांचा,त्याच्या मुलांच्या चेहऱ्यावरचा तो आनंद आपल्यासाठी खूप लाखमोलाचा होता आपण खूप काही जगावेगळी गोष्ट केली नाही,पण त्याचा आनंद पाहून जग जिंकल्याचा भास आपल्याला नक्की होतो.
हा उपक्रम क्रांतीज्योती महिला विकास संस्था आणि आपल्या मैत्रिणी व मित्रपरिवाराने एकत्र येवून राबविला आहे.
ही दिवाळी आदिवासी भागातील वंचित लोकांसाठी.... क्रांतीज्योती महिला विकास संस्थातर्फे दिवाळीसाठी कपडे, मुलांसाठी खेळणी,मिठाई, आकाश कंदील तसेच दिवाळीच्या शुभेच्छा देऊन साजरी करण्यात आली.
क्रांतीज्योती महिला विकास संस्थेच्या अध्यक्षा सोहनी डांगे यांनी सर्वांना दर वर्षीची दिवाळी आपण एकत्र सोबत साजरी करू असे सांगितले व सर्वांना शुभेच्याही दिल्या यावेळी ज्ञानेश डांगे,सागर घम,मनीषा सिन्नरकर, नक्षत्र डांगे,स्वरा घम उपस्थित होते .
क्रांतीज्योती महिला विकास संस्थेच्या सर्व खास मैत्रिणींचे म्हणजे अंजली कुचेरिया,सायली झगाडे,शितल ढगेपाटील,मनीषा सिन्नरकर,श्वेता घम यांचे विशेष आभार मानते अशीच साथ व सहकार्य आपल्याला नेहमी लाभो.
------------------------------------------------------------------
Comments
Post a Comment