शाश्वत शहर विकासासाठी संवाद चर्चासत्र - ‘Golden Dialogues’ - Role of Placemaking in Urban Revitalisation on 14th October 2022

celebrate its Golden Jubilee Year, VK Group cordially invites you to the first session of ‘Golden Dialogues’ - Role of Placemaking in Urban Revitalisation on 14th October 2022
शाश्वत शहर विकासासाठी संवाद ............
Time- 5.30 PM to 7.30 PM 
at Navalmal Firodia Auditorium, Bhandarkar Oriental Research Institute (BORI) Campus, Law College road, Pune.

Please register as the capacity is limited. 
For registration- https://forms.gle/KwL7nDsienVTcUhr6https://forms.gle/KwL7nDsienVTcUhr6
Press note 

'गोल्डन डायलॉग्स'  संवादमालेचे आयोजन
-------------------
शहर विकासाशी निगडित मुद्द्यांवर १४ ऑक्टोबर रोजी चर्चासत्र

पुणे प्रतिनिधी :
शहर विकासाशी निगडित मुद्द्यांवर  निगडित सर्व घटकांशी चर्चा करण्यासाठी 'गोल्डन डायलॉग्स' या संवादमालेचे आयोजन करण्यात येत असून त्यातील पहिले चर्चासत्र १४ ऑक्टोबर रोजी होणार आहे.

ज्येष्ठ आर्किटेक्ट  विश्वास कुलकर्णी यांनी स्थापन केलेल्या व्ही. के. ग्रुप या प्रसिद्ध  आर्किटेक्चर कंपनीच्या सुवर्णमहोत्सवानिमित्त ही संवादमाला आयोजित करण्यात आली आहे.व्हीके ग्रुपच्या सौ अपूर्वा कुलकर्णी यांनी ही माहिती दिली.  

'गोल्डन डायलॉग्स' मधील पहिली संवादमाला 'रोल ऑफ प्लेसमेकिंग इन अर्बन रिव्हायटलायजेशन'  या विषयावर  शुक्रवार,१४ ऑक्टोबर २०२२ रोजी सायं ५. ३० वाजता 
नवलमल फिरोदिया ऑडिटोरियम, भांडारकर ओरिएंटल रिसर्च इन्स्टिटयूट(विधी महाविद्यालय रस्ता, पुणे )येथे होणार आहे.  
या  संवादमालेमध्ये  राज्याचे नोंदणी महानिरीक्षक  श्रावण हर्डीकर,पुणे स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. संजय कोलते  'व्हीके यु अर्बन' चे  विजय साने, 'अर्बन ट्री'चे  नकुल रेगे, 'स्टुडिओ इनफील' चे  रोहित गादिया या  तज्ज्ञांचे मार्गदर्शन व चर्चासत्र होणार आहे. 'वाइल्ड अँगल फोरम'च्या प्रिया गोखले या  चर्चासत्राचे मॉडेरेटिंग करणार आहेत.  'आर्किटेक्ट, इंजिनिअर्स, सर्व्हेयर्स  असोसिएशन', 'इन्स्टिटयूट ऑफ अर्बन डिझायनर्स इंडिया' आणि 'वाइल्ड अँगल फोरम' या संस्थेच्या सहकार्याने ही  संवादमाला होत आहे.  संवादमाला  सर्वांसाठी विनामूल्य व खुली आहे.
 
शाश्वत शहर विकासासाठी संवाद

 पुणेकरांना  भेडसावणाऱ्या शहरी समस्या, पर्यावरणविषयक जागरूकता, शाश्वत शहर विकास,  शहरी जीवनाची गुणवत्ता  अशा गोष्टींवर ऊहापोह करण्यासाठी या क्षेत्रातील राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय तज्ज्ञ, सरकारी अधिकारी, स्थापत्यशास्त्राचे  विद्यार्थी, नागरिक, इंजिनिअर्स, वास्तुविशारद, स्टेकहोल्डर्स यांना या संवादमालेत आमंत्रित करण्यात येणार आहे. या संवाद मालिकेची येत्या वर्षभरात पाच सत्रे नियोजित करण्यात आली आहेत.ज्यामध्ये 'रोल ऑफ प्लेसमेकिंग इन अर्बन रिव्हायटलायजेशन, पुणे शहरासाठी हवामान कृती आराखडा, डिझाइन स्पर्धेची भूमिका, शहरी इमारतीमध्ये रेटिंग सिस्टीमचे महत्व, पर्यावरणीय लँडस्केपिंग आणि शाश्वत शहरीकरण  यासारख्या शहर विकासाशी निगडित विविध  विषयांवर तज्ञांसोबत  चर्चा केली जाईल. 

सुवर्णमहोत्सवानिमित्त पुढाकार

  आर्किटेक्ट  विश्वास कुलकर्णी यांनी  १९७३ साली सुरु केलेली ही आर्किटेक्चर प्रॅक्टिस आता  जवळपास २५० लोकांचे कुटुंब बनली आहे. झपाट्याने वाढणाऱ्या पुणे शहराचा प्रवास विश्वास कुलकर्णी यांनी अगदी जवळून पाहिलेला आहे. व्यवसाय कायमच चोख आणि प्रामाणिकपणे करण्याबरोबर त्यांनी समाजोपयोगी काम करण्यावर  भर दिलेला आहे. पुण्यातील या सर्वात जुन्या आणि मोठ्या कंपनीचा  पुणे शहराच्या विकासात मोलाचं वाटा आहे. फक्त आर्किटेक्चर प्रॅक्टिस पासून सुरु झालेली ही फर्म आज  शहर नियोजन, पर्यावरण, ग्रीन बिल्डींग्स, इंटेरिअर डिझाइन अशा विविध क्षेत्रात अग्रेसर  आहे. पुणे शहरातील दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर,जिल्हा परिषदेची नवी प्रशासकीय इमारत,परमार ट्रेड सेंटर अशा १ हजाराहून अधिक इमारतीचे आरेखन या कंपनीने केले आहे. ग्रीन होम्स प्लॅटिनम प्रमाणन व्ही के ग्रुप कडून केले जाते.विश्वास कुलकर्णी यांना त्यांच्या योगदानाबद्दल ग्लोबल रिअल इस्टेट काँग्रेसने 'टॉपमोस्ट आर्किटेक्चर लीडर्स' पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.  
पर्यावरण, पर्यटन , आरोग्य विषयाशी निगडित बातमी, लेख , जाहिरातीचे हक्काचे व्यासपीठ 
पाक्षिक पर्यावरणनिर्णय
Digital पर्यावरणनिर्णय
Contact - paryavarannirnay@gmail.com
Whatsapp - 8329906015

Comments

Popular posts from this blog

MTDC च्या माध्यमातून पर्यटकांसाठी दिवाळीनिमित्त अनोखी पर्वणी ...

तळजाई टेकडीवर जल पुनर्भरण उपक्रम