MTDC च्या माध्यमातून पर्यटकांसाठी दिवाळीनिमित्त अनोखी पर्वणी ...

महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाकडुन पर्यटकांसाठी दिपोत्सवाची अनोखी पर्वणी....
महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाची पर्यटक निवासे 100 टक्के फुल होणार….
प्रत्येक प्रांताच्या लोकसंस्कृतीबाबत पर्यटकांच्या मनामध्ये प्रचंड उत्सुकता असते. सांस्कृतिक कार्यक्रमांच्या माध्यमातुन तसेच वेगवेगळया लोकरुचक लोककला यांव्दारे पर्यटकांना आनंद दिल्यास पर्यटन व्यवसाय निश्चित बहरतो. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाव्दारे एकुण 30 निवासे व उपहारगृह यांचे परिचलन होत आहे. महामंडळाच्या कर्मचारी वर्गाने आजवर घेतलेल्या आणि घेत असलेल्या अथक प्रयत्नांमुळेच आज महामंडळाची ख्याती साऱ्या भारतभर पसरली आहे. केवळ महाराष्ट्रतुनच न्हवे तर देशभरातुन असंख्य अतिथी पर्यटक निवासामध्ये वास्तव्यास येत असतात. ‘अतिथी देवो भव’ या नीतीचा अवलंब करत येणाऱ्या पर्यटकांना निवासामधील कर्मचाऱ्यांव्दारे उत्तम सोइसुविधा पुरविल्या जातात.
बेधुंद पावसाने चिंब भिजत वर्षा पर्यटन अनुभव घेण्यास चुकलेल्या पर्यटकांसाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ घेवुन येत आहे दिपोत्सवाचा अनोखा क्षण.... आगामी दिपावलीचा उत्सव आणि गुलाबी थंडी मध्ये खाशा पर्यटकांसाठी दिपोत्सव आणि पर्यटनाची शाही मेजवानीच होणार आहे....त्यामुळे महामंडळाची पर्यटक निवासे 100 टक्के आरक्षित होत आहेत.
महामंडळाकडुन पर्यटकांसाठी विशेष सवलती जाहीर केल्या असल्यामुळे मागिल काही काळात पर्यटनास बहर आला आहे. तशातच गुलाबी थंडीची चाहुल आणि दिपावलीच्या सुटटीचे वेध पर्यटकांना लागले असल्याने पर्यटकांची पावले आपोआप थंड हवेची ठिकाणे आणि निसर्गाकडे वळत आहेत. 
महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने ही कोजागिरी आणि दसऱ्याच्या स्वागतासाठी जय्यत तयारी केली होती.  पर्यटक केद्रस्थानी ठेवुन “अतिथी देवो भव” या नात्याने पर्यटकांना नेहमीच सर्वोत्तम सुविधा दिल्यामुळे महामंडळास पर्यटकांनीही भरघोस प्रतिसाद दिला आहे. बऱ्याच नवीन सुविधांसह अद्ययावत करण्यात आलेले संकेतस्थळ, जेष्ठ नागरिक, शासकिय कर्मचारी, आजी आणि माजी सैनिक यांचेसाठी दिलेल्या सवलती, प्रशिक्षित कर्मचारी वर्ग, यांमुळे  पर्यटकांचा दिपावलीचा आनंद द्विगुणीत होत आहे.    
आगामी गुलाबी थंडीचा हंगाम आणि दिपावलीच्या सुटटीसाठी आतापासुनच नियोजन पर्यटकांनी सुरु केल्याचे दिसुन येत आहे. थंडीचा हंगाम आणि दिवाळी च्या सुटटयांसाठी नोकरदार वर्ग आणि पर्यटन व्यावसायिक ही पर्यटनाचे नियोजन करीत आहेत. त्यासाठी पर्यटन विकास महामंडळानेही जय्यत तयारी सुरु केली आहे. सर्व पर्यटक निवासांमध्ये आकर्षक विद्युत रोषणाई आणि सजावट करण्यात येणार आहे. दिपोत्सव, आकाशकंदील आणि सुदर रांगोळी काढुन दिपावली साजरी करण्यात येणार आहे. सण उत्साहात साजरा करण्याबरोबरच या सणाचे भारतीयांसाठी असलेले महत्त्वही सांगण्यात येणार आहे. गुलाबी थंडीमध्ये आणि निसर्गसंपन्नअसलेल्या पर्यटक निवासांमध्ये योगा आणि मेडीटेशनही करण्यात येणार आहे.  
पर्यटन समृध्द असलेल्या महाराष्ट्रामध्ये पर्यटन आणि पर्यावरण अशा दोन्ही घटकांचा विचार करत पर्यटनास चालना देण्याचा महामंडळाचा मनोदय आहे.  
सवलती - हिवाळी पर्यटन हंगामासाठी महामंडळाच्या पर्यटक निवासांचे जोरदार बुकिंग सुरु असल्याचे निदर्शनास येत असल्याने निसर्गरम्य असलेल्या पर्यटक निवासामध्ये गुलाबी थंडीचा आनंद घेण्यासाठी पर्यटक ही उत्सुक असल्याचे दिसुन येत आहे. महामंडळानेही हिवाळी पर्यटन  आणि दिपावली सुटयांसाठी नवनव्या संकल्पना राबविण्यासाठी जोरदार तयारी केली आहे. अशा पर्यटकांसाठी अनोख्या सवलती जाहीर केलेल्या आहेत. जेष्ठ नागरिकांसाठी 20 टक्के, शासकिय कर्मचारी यांना आगाऊ बुकिंगसाठी 10 ते 20 टक्के सवलती जाहीर करण्यात आल्या आहेत. सामाजिक बांधिलकी जपताना आजी – माजी सैनिक आणि अपंगांसाठी विशेष सवलती दिल्या आहेत. ग्रुप बुकिंगसाठी 20 खोल्यांपेक्षा जास्त बुकिंग असल्यास सवलत देण्यात येत आहेत.  शालेय सहलींसाठी विशेष सवलती देण्यात येत आहेत. तसेच काही नाविन्यपुर्ण निर्णय घेताना महामंडळानेही पर्यटकांचा आनंद द्विगुणीत करण्यासाठी निवडक ठिकाणी वाय-फाय सुविधा सुरु केली असल्याने पर्यटक मोठया प्रमाणावर आनंद व्यक्त करीत आहेत. 
सोयी – सुविधा :- पर्यटकांच्या सुरक्षेस सर्वोच्च प्राधान्य देताना शासनाने दिलेल्या मार्गदर्शक सुचनांचे काटेकोरपणे पालन करीत उपहारगृह, रिझॉर्ट आणि अनुषंगिक बाबींची तसेच परिसराची काटेकारेपणे स्वच्छता आणि पर्यटकांना त्याच्या खोल्यांपर्यंत अल्पोपहार, जेवण आणि अन्य अत्यावश्यक सुविधा पुरविण्यात येत आहेत. तसेच शासनाच्या सर्व नियमांच्या अधीन राहुन प्री – वेडींग फोटोशुट आणि डेस्टीनेशन वेडींग चीही सोय करण्यात येणार आहे.

 महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाची सर्व पर्यटक निवासांचे आरक्षण सुरु असुन www.mtdc.co या वेबसाईटवर ऑनलाईन बुकिंगही सुरु करण्यात आले आहे. आगामी काळात पर्यटकांचा ओढा लक्षात घेवुन मोठया प्रमाणावर सवलती देण्यात येणार असुन पर्यटकांसाठी नाविन्यपुर्ण अशा वर्क फ्रॉम नेचर आणि वर्क विथ नेचर या संकल्पनेअंतर्गत काही रिझॉर्टवर वाय फाय सुविधा पुरविण्यात येत आहेत. त्यामुळे पर्यटक निवासे दिपावलीच्या सुटटीच्या कालावधीत संपुर्णपणे भरणार आहेत. तसेच दिपावली नंतरही पर्यटक निवासांचे मोठया प्रमाणावर आरक्षण होत आहे. 
दिपोत्सव - पर्यटनाची राजधानी असलेल्या औरंगाबाद मधील अजंठा, वेरुळ आणि लोणार या ठिकाणी अलीकडेच कोजागिरी पौर्णिमा साजरी केल्याने या जागतिक वारसा असलेल्या पर्यटन स्थळांना भेटी देण्यासाठी आगावु आरक्षण होत आहे, महामंडळाच्या पर्यटक निवासांमध्ये आणि जागतिक वारसा स्थळांच्या सानिध्यात दिपोत्सव साजरा करण्याचे आणि त्या निमित्ताने पर्यटकांना आपल्या संस्कृतीचे दर्शन घडविण्याचा महामंडळाचा मनोदय आहे. त्यानुसार दिपावली आणि दिपोत्सव साजरा करण्याच्या सुचना मा. व्यवस्थापकिय संचालक श्रध्दा जोशी यांनी दिल्या असुन मा. महाव्यवस्थापक चंद्रशेखर जयस्वाल यांच्या मार्गदर्शनाखाली दिपावली साजरी करण्याचे नियोजन करण्यात येत आहे.

महाराष्ट्राचा सांस्कृतिक वारसा, महाराष्ट्राची खाद्यसंस्कृती जपत, तीर्थक्षेत्रांना भेट देऊन आध्यात्मिक वारसा तर जंगल सफारीतुन साहसी अनुभव अशा अनेक पैलूंचा आणि निवांत समुद्रकिनारे व मोहक पर्वतरांगांमधील शांतता अनुभवण्यासाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ पर्यटकांना साद घालीत आहे. पर्यटनाबरोबरच पर्यावरण आणि भारतीय संस्कृतीचा ठेवा जपत पर्यटनाचा आनंद द्विगुणित करावा, असे आवाहन महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे प्रादेशिक व्यवस्थापक श्री. दिपक हरणे यांनी केले आहे.
----------------------------------------

जागतिक वारसा स्थळे आणि किल्ले –
अजंठा, वेरुळ, दौलताबाद, बिबि का मकबरा, राजगड, रायगड, जंजिरा, सिंधुदुर्ग.
समुद्रकिनारे – गाणपतीपुळे, दिवेआगार, वेळणेश्वर, हरीहरेश्वर, तारकर्ली..
अभयारण्ये – ताडोबा, नवेगांव, चिखलदरा, राधानगरी..
हिल स्टेशन – महाबळेश्वर, माथेरान, भंडारदरा, लोणावळा..

पर्यावरण, पर्यटन , आरोग्य विषयाशी निगडित बातमी, लेख , जाहिरातीचे हक्काचे व्यासपीठ 
पाक्षिक पर्यावरणनिर्णय
Digital पर्यावरणनिर्णय
Contact - paryavarannirnay@gmail.com
Whatsapp - 8329906015

Comments

Popular posts from this blog

क्रांतीज्योती व आपल्या मैत्रिणी संस्थेचा आदिवासी पाड्यात दिवाळी निमित्त आनंदाचा दिवा .....

ICICI बँकेच्या माध्यमातून बीड जिल्ह्यातील 100 गावे जल आत्मनिर्भरतेकडे .... CSR Fund