ध्वनी प्रदूषणाने त्रस्त पुणेरी MR लेले मुख्यमंत्री - उपमुख्यमंत्री साहेबांच्या कानापर्यंत गेले ....
ध्वनी प्रदूषणाने त्रस्त पुणेरी MR लेले मुख्यमंत्री - उपमुख्यमंत्री साहेबांच्या कानापर्यंत गेले .... ध्वनी प्रदूषणावरून पुण्याच्या विलास लेलेंनी थेट मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री याना पाठवलेले पत्र. खालीलप्रमाणे .... दि.१०.०९.२०२२ श्री.एकनाथजी शिंदे. मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य. मुंबई. विषय : बंधनमुक्त गणेशोत्सव. महोदय, आपण आघाडीमुक्त महाराष्ट्र करून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झालात म्हणून सर्व प्रथम आपले मनःपूर्वक अभिनंदन. महोदय, आपण आता ठाण्याचे किंवा ठाण्यातील मंडळाचे प्रमुख नाहीत तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहात,हे लक्षात घेऊन प्रत्येक गोष्टीत जनतेच्या हिताचे योग्य निर्णय घ्यावेत ही विनंती. फक्त प्रसिद्धी व मुठभर कार्यकर्त्यांना खुश ठेवण्यासाठी आपण बंधनमुक्त गणेशोत्सवाची घोषणा केल्याने दहा दिवस पुणे शहर वेठीस धरले गेले असे होऊ नये ,आपण महाराष्ट्रात बंधन मुक्त गणेशोत्सव साजरा करण्याचे घोषीत केलेत त्या प्रमाणे गणेशोत्सव व विसर्जन मिरवणूक पार पडली.परंतु गणेशोत्सव काळात दहा दिवस समस्त पुणेकर वाहतूक कोंडीमुळे अक्षरशः हैराण झाले होते तसेच मिरवणूकीत काही मंडळ...