शिवोदय मित्र मंडळास पुणे पोलीस आयुक्तांकडून परिमंडळ १ गणेशोत्सव चा द्वितीय क्रमांक .

शिवोदय मित्र मंडळास पुणे पोलीस आयुक्तांकडून परिमंडळ 1 गणेशोत्सव चा द्वितीय क्रमांक .
नित्य वसुंधरा गणेशोत्सव च्या माध्यमातून 1500 देशी वृक्षांच्या उपक्रमाचा पुणे पोलिसांनी केला सन्मान .

पुणे प्रतिनिधी :- पुणे शहर पोलीस प्रशासनाच्या वतीने दर वर्षी प्रमाणे यंदाही विघनहर्ता पुणे पोलीस हा सन्मान मंडळांचा केला जातो , सामाजिक , प्रबोधनात्मक , पर्यावरण , जनजागृती विषयांवरील देखाव्यांना यात प्राधान्य दिले जाते  यंदाच्या वर्षी ही पुण्यातील अनेक मंडळांना सन्मानित करण्यात आले .
       शिवोदय मित्र मंडळ नवी पेठ , MY EARTH संस्था , आणि निवृत्त ACP श्री सुभाष डांगे सर यांच्या सहकार्यातून मार्गदर्शनाने मंडळाने यंदा नित्य वसुंधरा गणेशोत्सव साजरा केला , या उत्सवात आंबा, नारळ, चिक्कू, डाळिंब, फणस, आवळा, कडीपत्ता, कडुनिंब, अर्जुन, पिंपळ , अश्या अनेक भारतीय 1500 वृक्षांच्या 5 फूट उंच रोपांचे वाटप करण्यात आले .

या उत्सवातून वृक्ष दत्तक योजना राबविण्यात आली , तसेच पोस्टर , सोसिएल मीडिया, व्हिडीओ प्रोजेक्टर च्या माध्यमातून जनजागृती करण्यात आली , या उपक्रमाची दखल पुणे पोलीस यांनी घेऊन परिमंडळ 1 च्या वतीने आयुक्त अमिताभ गुप्ता , पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते द्वितीय क्रमांक ट्रॉफी , प्रशस्तीपत्र देऊन मंडळाच्या कार्यकर्त्यांचा सन्मान करण्यात आला. 

   यावेळी मंडळाचे प्रमुख दिनेश भिलारे यांनी बोलताना निवृत्त ACP श्री सुभाष डांगे  , MY EARTH चे अध्यक्ष अनंत घरत , ललित राठी ,वकील श्री निकम , राजेश दातार,  हितेंद्र सोमाणी , राज मुछाल, तसेच मंडळाचे अध्यक्ष किरण भगत , सर्व कार्यकर्त्यांचे आभार मानले .
   वसुंधरा उत्सवाचे संस्थापक श्री सुभाष डांगे यांनी हा उत्सव हा लोकउत्सव व्हावा यासाठी सर्वांनी प्रयत्न करावे तरच या वसुंधरा मातेचे आपण ऋण फेडू शकतो असे बोलले .

पर्यावरण, पर्यटन , आरोग्य विषयाशी निगडित बातमी, लेख , जाहिरातीचे हक्काचे व्यासपीठ 
पाक्षिक पर्यावरणनिर्णय
Digital पर्यावरणनिर्णय
Contact - paryavarannirnay@gmail.com
Whatsapp - 8329906015

Comments

Popular posts from this blog

MTDC च्या माध्यमातून पर्यटकांसाठी दिवाळीनिमित्त अनोखी पर्वणी ...

क्रांतीज्योती व आपल्या मैत्रिणी संस्थेचा आदिवासी पाड्यात दिवाळी निमित्त आनंदाचा दिवा .....

ICICI बँकेच्या माध्यमातून बीड जिल्ह्यातील 100 गावे जल आत्मनिर्भरतेकडे .... CSR Fund