पुण्याचा विकास पर्यावरण दृष्टीने सकारात्मक व्हावा - मा पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे .
पुण्याचा विकास पर्यावरण दृष्टीने सकारात्मक व्हावा - मा पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे .
शिवसेना नेते,युवासेना प्रमुख आणि महाराष्ट्र राज्याचे माजी पर्यावरण मंत्री मा.आदित्यसाहेब ठाकरे यांनी पुणे महानगरपालिकेचे आयुक्त मा.विक्रम कुमार यांची भेट घेतली. या भेटीमध्ये पुणे महानगरपालिकेला पर्यावरण क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कामाबद्दल आंतरराष्ट्रीय स्तरावरचा सी-४० पुरस्कार मिळाल्याबद्दल मा.आयुक्त साहेबांचे अभिनंदन केले.
पर्यावरणाशी निगडीत कामांना चालना व गती मा.आदित्यसाहेब पर्यावरणमंत्री असताना दिलेली होती.त्यामुळे मा.आदित्य ठाकरे पुणे शहराला मिळालेल्या या पुरस्कारासाठी खास अभिनंदन करण्यासाठी पुणे महानगरपालिकेत आले होते.
तसेच पुणे शहरातील पर्यावरण, ई-बस, सार्वजनिक वाहतुक व्यवस्था,पावसाळी पाण्याचे नियोजन, ई-बाईक, रस्ते, फूटपाथ, सायकल ट्रॅक या प्रश्नांबाबत चर्चा केली व पुणे शहराच्या विकासासाठी काही उपयुक्त अशा सूचना केल्या , पुणे शहरात परतीच्या पावसाने केलेले नुकसान आणि उपाययोजना यावर ही चर्चा केली आणि मा.आयुक्त साहेबांनी या सूचनांसाठी सकारात्मक असा प्रतिसाद दिला,
या वेळेस शिवसेनेचे पुणे शहर संपर्कप्रमुख आमदार.मा.सचिनभाऊ अहिर ,शिवसेनेचे माजी गटनेते मा.पृथ्वीराज शशिकांत सुतार, शहरप्रमुख - गजानन थरकुडे, शहरप्रमुख - संजय मोरे, पुणे हे उपस्थित होते.
पर्यावरण, पर्यटन , आरोग्य विषयाशी निगडित बातमी, लेख , जाहिरातीचे हक्काचे व्यासपीठ
पाक्षिक पर्यावरणनिर्णय
Digital पर्यावरणनिर्णय
Contact - paryavarannirnay@gmail.com
Whatsapp - 8329906015
Comments
Post a Comment