RFD विरोधात पुणेकर, पर्यावरण प्रेमी यांचा पुणे मनपा वर मोर्चा.....

 RFD विरोधात पुणेकर, पर्यावरण प्रेमी यांचा पुणे मनपा वर मोर्चा.....

नदी काठ प्रकल्पाच्या आराखड्यात पुर नियंत्रित करण्यासाठी आहे, असा उल्लेख करण्यात आला असला, तरी कॉंक्रीटीकरण मुळे पूर परिस्थिती गंभीर होणार आहे. याचाच विचार करीत पुण्यातील नागरिकांकडून या प्रकलपाला विरोध करण्यासाठी साखळी उपोषण करण्यात आले. या अंतर्गत महापालिे केच्या अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. 
पुणेकर नागरिकांच्या वतीने गरवारे महाविद्यालय ते महापालिका भवन असा मोर्चा ही काढण्यात आला. या मोर्चात ज्येष्ठ नागरिकांसह चौदा वर्षांची तरुणी ही सहभागी झाली होती. या वेळी मनीष घोरपडे, शुभा कुलकर्णी, शामली नलावडे, मिरा शाह, वरुण मिगलानी, संध्या नटराजन, शातक्षी गावडे, मुकुंद शिंदे, ललित राठी, शेलेंद्र पटेल, मनीष घोरपडे यासह नागरिक उपस्थित होते. 
नदीकाठ सुधार प्रकल्पांतर्गत करदा्यां चे ५ हजार कोटी रुपये खर्चून पुण्या तील नद्यांचे पात्र मोठ्या प्रमाणावर कॉंक्रीटीकरना च्या भिंती उभारून आरुंद करणायत येणार आहे. तीन बंधाऱ्याच्या सहायाने प्रवाह आढवून तळी तयार करून बोटिंग करण्याची योजना आखण्यातआली आहे. वास्तविक पाहता त्यामुळे पुराचा धोका अधिक वाढ नार आहे
पुण्याच्या नद्या साठी पुणेकर हा लढा गेले २०० दिवस सातत्याने देत असून यापुढेही हा लढा कायम राहणार आहे. हे साखळी उपोषण सुरूच ठेवणार असून प्रशासनाने नद्यांमधील सर्व अतिक्रमणे काढली पाहिजेत. सर्व नद्या निर्मळ झाल्या पाहिजेत. नद्यांच्या कट छे द कुठेही कमी होता कामा नये आणि नद्यांचे पुनर्जीवन कॉंक्रीटीक ने न करता फक्त पर्यावरण पूरक मार्गानेच पूर्ण झाले पाहिजे, या प्रमुख मागण्या यावेळी करण्यात आल्या.

Comments

Popular posts from this blog

विजयादशमीच्या शुभमुहूर्तावर पाक्षिक पर्यावरणनिर्णय वृत्तपत्रचे उदघाटन .....

पुण्याचा विकास पर्यावरण दृष्टीने सकारात्मक व्हावा - मा पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे .

क्रांतीज्योती व आपल्या मैत्रिणी संस्थेचा आदिवासी पाड्यात दिवाळी निमित्त आनंदाचा दिवा .....