विजयादशमीच्या शुभमुहूर्तावर पाक्षिक पर्यावरणनिर्णय वृत्तपत्रचे उदघाटन .....
विजयादशमीच्या शुभमुहूर्तावर
पाक्षिक पर्यावरण निर्णय वृत्तपत्रचे उदघाटन
आज प्रथम अंक चे उदघाटन पुणे शहरातील सामाजिक , राजकीय , पर्यावरण, क्षेत्रातील मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाले .
अंकाचे उदघाटन शुभहस्ते श्री माणिक दादा चव्हाण अध्यक्ष - श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट ) यांच्या हस्ते झाले .
या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून वनराई संस्थेचे अध्यक्ष श्री रवींद्र धारिया सर , पुणे जिल्हा अॅथलेटिक्स संघटनेचे श्री अभयजी छाजेड , ग्राहक पंचायतीचे श्री विजय लेले , माजी ACP पुणे पोलीस श्री सुभाष जी डांगे , माय अर्थ चे श्री ललित राठी, पर्यावरण निर्णय चे संपादक अनंत घरत व्यासपीठावर उपस्थित होते .
प्रेक्षकांमध्ये संभाजी ब्रिगेड चे संघटक संतोषजी शिंदे , युक्रांद चे जांभुवंत मनोहर, वनस्पती अभ्यासक डॉ सचिन पुणेकर , माजी नगरसेवक धनंजय जाधव , वनराई मासिकाचे संपादक अमित वाडेकर, संयुक्त स्त्री संस्थेच्या अध्यक्षा नीता ताई रजपूत, महा NGO चे मुकुंद शिंदे , ECI संस्थेचे गणेश शिरोडे , पर्यावरण रक्षक सत्या नटराजन , पर्यावरण प्रेमी मनीषा दाते मॅडम, पतित पावन चे जिल्हाध्यक्ष दिनेश भिलारे , चंदन तज्ञ महेंद्र घागरे, रवींद्र गांधी , ओसाडे ग्राम विकास संस्थेचे तानाजी लोहकरे, जिओ फाउंडेशन च्या प्रीती काळे , श्रीकांत मेमाणे , सामाजिक कार्यकर्ते पुरुषोत्तम ओव्हाळ, प्रसाद चावरे , मीनल रवी भोसले , पर्यावरण निर्णय च्या निलम जाधव , प्रकाश चव्हाण, म्हस्के साहेब , अरविंद पगारे, मनीष घरत , विजय जोरी, हनुमंत फडके आणि इतर पर्यावरण प्रेमी नागरिकांच्या उपस्थिती मध्ये प्रथम अंकाचा उदघाटन सोहळा पुणे मनपा च्या इंद्रधनुष्य पर्यावरण हॉल मध्ये संपन्न झाला .
सर्व उपस्थितांनी पाक्षिक पर्यावरणनिर्णय च्या प्रथम अंकाचे कौतुक केले .
यावेळी कार्यक्रमाची प्रस्तावना व MY EARTH संस्थेच्या कार्याची माहिती श्री ललित राठी (सदस्य - संपादकीय कार्यकारी मंडळ ) यांनी दिली .
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार अनंत रामचंद्र घरत संपादक - पाक्षिक पर्यावरणनिर्णय यांनी केले .
Comments
Post a Comment