महात्मा गांधी व पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त स्वच्छता, शिक्षण, महिला सक्षमीकरण विषयावर जागृती फेरी ........

महात्मा गांधी व पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त स्वच्छता, शिक्षण, महिला सक्षमीकरण विषयावर जागृती फेरी ........
 राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि भारताचे दुसरे पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांना जयंतीनिमित्त स्वराजयज्ञ समुह या संस्थेच्या महिलांमार्फत  दत्तवाडी - राजेन्द्र नगर भागात जनजागरण फेरी आयोजित केली गेली. या फेरीमधून शिक्षण, स्वच्छता व महिला सक्षमीकरण या विषयांवर जनजागृती करण्यात आली.
             स्वराजयज्ञ समुहाचे अध्यक्ष अभिजीत धुमाळ व महिला शाखेच्या पुणे शहर प्रमुख अ‍ॅडव्होकेट सौ. वर्षाताई अभिजीत धुमाळ यांनी या जनजागृती फेरीचे आयोजन केले. सुर्वे परिवारातर्फे कै. संजय सुर्वे यांच्या स्मरणार्थ विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आला.
पुणे मनपाचे आरोग्य कोठी क्र. २९, ३० चे कर्मचारी, अधिकारी तसेच मनपा शाळा क्र. ८० दत्तवाडी, न्यु इंग्लिश स्कुल, टिळक रोड पुणे या शाळेचे विद्यार्थी व शिक्षक, ईनेब्लर फांऊंडेशन या दिव्यांगासाठी कार्य करणाऱ्या संस्थेने सहभाग घेतला.
कार्यक्रमास आरोग्य अधिकारी कदम मँडम, संदिप खेराडे, सिध्देश घरबुडवे तसेच मुख्याध्यापिका मनिषा रेड्डी, वैशाली सुर्वे, मनोरमा चौधरी, पिंकीताई वाडेकर, माया ताठे,  अमोल शिंगारे, रमेश लडकत, प्रसाद चावरे, शशांक सुर्वे आणि  शिक्षक व इतर कर्मचारी वर्ग उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

विजयादशमीच्या शुभमुहूर्तावर पाक्षिक पर्यावरणनिर्णय वृत्तपत्रचे उदघाटन .....

पुण्याचा विकास पर्यावरण दृष्टीने सकारात्मक व्हावा - मा पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे .

क्रांतीज्योती व आपल्या मैत्रिणी संस्थेचा आदिवासी पाड्यात दिवाळी निमित्त आनंदाचा दिवा .....