Peepal Tree चित्रपट 'झाडांच्या मर्डर" ची वेदना सांगणारी आणि त्यासाठी लढणाऱ्या वृक्ष प्रेमींची कथा प्रत्येकाने पहावी - Digital पर्यावरण निर्णय

Peepal Tree चित्रपट 'झाडांच्या मर्डर"  ची वेदना सांगणारी आणि त्यासाठी लढणाऱ्या वृक्ष प्रेमींची कथा प्रत्येकाने पहावी - Digital पर्यावरण निर्णय
अनंत घरत ( MY Earth )- काहीच वर्षांपूर्वी रस्ता रुंदीकरण कारण सांगून पुणे विद्यापीठ ते औंध ब्रेमेन चौक या रस्त्यावरील काही 100 वर्ष जुनी तर काही चांगली मोठी झालेली वड, पिंपळ, अशी अनेक झाडे तोडण्याचा प्रकार झाला होता .
त्यावेळी पुण्यात कुठेही वृक्षतोड झाली की आम्ही धावत पळत जाऊन अनेक झाडे वाचविणे नित्याचेच असे , इथे तर सरसकट शेकडो झाडांचे बळी पुणे मनपा प्रशासनाने लावले होते , या विरोधात पर्यावरण प्रेमी सर्व एकवटले . 
स्वच्छ पुणे ,सुंदर पुणे ,हिरवे गार पुणे ह्या फक्त भिंती रंगवण्यापूरत्या घोषणा दिसत होत्या .
यावेळी रात्रीची गस्त घालण्यासाठी कस्तुरबा गांधी वसाहतीतील मुलांनी पण खूप कष्ट घेतले , पुण्यातील अनेक सुशिक्षित मंडळी या आंदोलनात सहभागी झाले पुणे महानगरपालिकेत अनेक मीटिंग झाल्या पण हालेल ते प्रशासन कुठले .
एकदिवस सकाळी लवकर चतुरशृंगी पोलीस स्टेशन समोर सह्यांची मोहीम राबविण्यात आली पण गंमत अशी की आम्ही चहा ला गेलो आणि सह्यांची मोहिमचा बॅनर च गायब केला गेला नन्तर तर जे सी बी च्या साहाय्याने झाडे तोडण्याचा प्रयत्न पण झाला .
मग आंदोलन पेटले आणि पुणे महानगरपालिकेवर श्री विनोद जैन सर यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्व पर्यावरण, वृक्ष प्रेमींनी वृक्ष अंत्ययात्रा नेण्याचे ठरविले .
( वृक्ष अंत्ययात्रेत सहभागी My Earth चे अध्यक्ष अनंत घरत आणि टीम )
या लढ्यात अग्रभागी होते ट्री ऍक्ट जनजागरण करणारे श्री विनोदजी जैन एक वृक्ष रक्षक 
पुण्याची हिरवाई टिकविण्यासाठी लढणारा सच्चा सैनिक वृक्ष हे दैवत सांगण्याची त्यांची धडपड आम्हा युवा पिढीला उर्जात्मक होती .
अनेक कार्यकर्ते यातून घडले आणि आजही हिरवेगार पुणे असावे , जैवविविधतेने नटलेले , सह्याद्री च्या कुशीतले टुमदार शहर राहावे यासाठी लढत आहेत ..
(वृक्ष अंत्ययात्रा पुणे मनपा च्या दारात नतमस्तक होताना सत्या नटराजन आणि पर्यावरण प्रेमी.)

Peepal Tree Film 'Murder of Trees' tells the story of the pain and struggle of tree lovers everyone should watch 
- Digital Environment Decision पर्यावरणनिर्णय 

Comments

Popular posts from this blog

MTDC च्या माध्यमातून पर्यटकांसाठी दिवाळीनिमित्त अनोखी पर्वणी ...

शाश्वत शहर विकासासाठी संवाद चर्चासत्र - ‘Golden Dialogues’ - Role of Placemaking in Urban Revitalisation on 14th October 2022

तळजाई टेकडीवर जल पुनर्भरण उपक्रम