तळजाई टेकडीवर जल पुनर्भरण उपक्रम
पुणे प्रतिनिधी - टेलस र्ऑर्गनायझेशन संस्थेच्या माध्यमातून तळजाई टेकडीवर पाणी आडवा पाणी जिरवा या तत्वावर बंधारा बांधण्यात आला होता. हा बंधारा पूर्ण भरला असून जल पुनर्भरणाचे उद्दिष्ट साध्य झाले आहे .
पाणी फाउंडेशनचे प्रोजेक्ट डायरेक्टर श्री नामदेव ननावरे यांची तळजाई टेकडीवरील बंधाऱ्यास भेट....तीन वर्षापूर्वी तळजाई टेकडीवर टेलस ऑर्गनायझेशन संस्थेचे लोकेश बापट यांच्या पुढाकरातून त्यांच्या सह विनय गोखले, जान्हवी बापट, संकेत जोगळेकर, हेरंब पाटणकर, अभिजीत घडशी अशा कार्यकर्त्यांसमवेत ' सुमारे तीन महिने मेहनत घेऊन पाणी आडवा पाणी जिरवा' तत्वावर बांधलेल्या मोठ्या बंधाऱ्याला भेट दिली. या तीन वर्षांमधील निरीक्षणात बंधाऱ्याचे क्षेत्र खूपच मोठे असल्याने सलग दोन-तीन दिवस पाऊस अथवा खूप मोठ्या प्रमाणात पाऊस झाला तरच तो पूर्ण क्षमतेने भरला जायचा. व पुढील तीन ते चार दिवसात हे सर्व पाणी भूगर्भात जिरले जायच. गेल्या तीन वर्षात अनेकदा झाल्याने भूगर्भात काही लाख लिटर पाण्याचे पुनर्भरण झाले .परंतु यावर्षी प्रथमच पुण्यात 11 तारखेला जो प्रचंड पाऊस पडला त्यामुळे हा बंधारा पूर्ण भरला . पहिल्यांदाच गेल्या १६/१७ दिवसात पाऊस नसताना देखील आज हा बंधारा पूर्ण भरला आहे. यामुळें जमिनीखाली पाणी जिरपण्याची क्षमता आता हळूहळू त्याची कमी होत चालली असून खूप मोठ्या ( काही लाख लिटर ) प्रमाणात पाण्याचे पुनर्भरण करण्यात टेलस संस्थेला यश मिळाले आहे.
( तळजाई टेकडीवरील बंधाऱ्यातील जल पुनर्भरण )आज या साठलेले पाणी पशुपक्षी व आजूबाजूची झाडे हिरवी होण्यास मोठ्या प्रमाणात मदत भविष्यात मिळणार आहे. जमिनी खालची पाण्याची पातळी देखील चांगल्या प्रमाणात वाढली गेली असण्याची शक्यता पाणी फाउंडेशनचे प्रोजेक्ट डायरेक्टर श्री नामदेव ननावरे सर यांनी प्रत्यक्ष भेट देऊन या कामाची माहिती दिली.
Comments
Post a Comment