पुण्यातील खड्डयांना डॉ कधी भेटणार ?

पुण्यातील खड्डयांना डॉ कधी भेटणार ?

पुणे प्रतिनिधी - पुण्यातील खड्ड्यांमुळे पुणेकरांनी हॉस्पिटल पाहिले , वाहनांनी गॅरेज पाहिले पण खड्डयांनी काय पाहिले तर पुण्याच्या रस्त्यांनी मागील काही वर्षात निकृष्ठ काम पाहिले , रस्त्यांच्या कामातील भ्रष्टाचार पहिला म्हणून आज पुण्याच्या रस्त्यांना डॉ पण भेटेना .

पुण्यातील रस्त्यांची अक्षरशः झाली चाळण याला कोण जबाबदार सत्ताधारी की प्रशासन की पुणेकर नागरिक ? 
पुण्यातील रस्त्यांची चाळण झाल्यानंतर पुणेकरांचा तीव्र संताप पाहायला मिळाला. 
आणि आता पुणे महापालिकेने यावर कारवाई करण्याचे निश्चित केले आहे. 
रस्त्यांची काम निकृष्ट करणाऱ्या 10 ठेकेदारांना 6 महिन्यांसाठी काळ्या यादीत टाकण्यात आले आहे.
या कामांची जबाबदारी असलेले 11 उपअभियंता आणि 13 शाखा अभियंत्यांना प्रत्येकी 15 हजार रुपयांचा दंड भरावा लागणार आहे. 
महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी ही कारवाई केली आहे. 
शहरात एकूण 150 खड्डे बुडवण्यात आले असले तरी रस्त्यांची अवस्था अजूनही खराब आहे.
139 रस्त्यांची त्रयस्थ संस्थेमार्फत तपासणी करून त्यांचा अहवाल सादर करण्यात आला होता.
त्यामध्ये 17 रस्ते निकृष्ट असल्याचं समोर आलं, त्यानुसार त्यांच्यावर कारवाई करण्याचा प्रस्ताव प्रस्तावित करण्यात आला होता, आता आयुक्तांनी या प्रस्तावाला मान्यता देत कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.
 ही परिस्थिती पुण्यातच आहे असे नाही तर संपूर्ण महाराष्ट्रात आहे म्हणजे नक्की कोणाचे चुकते यावर खरच आता विचार करण्याची गरज आहे .
रस्ते बांधणीचे शास्त्र आणि तंत्र जपले तर खड्डे विरहित रस्ते शक्य आहेत त्याचे एक उदाहरण आजही पुण्यात दिले जाते ते म्हणजे जंगली महाराज रस्ता भ्रष्ट, टक्केवारी संपली तर पुणेकरांचा टॅक्स रुपी पैसा नक्कीच योग्य जागी वापरला जाईल हे नक्की . 

पुणेकर दुचाकी चालक दंड भरून वैतागले , चौकांमधील सी सी टी व्ही कॅमेऱ्यातून ऑनलाईन दंड वर दंड येतात पण खड्ड्यांसाठी कोणाला दंड करायचा कळेना .
पुण्यातील रस्त्यांना आयसीयु त नेण्याची वेळ पण निघून गेली आहे .
त्यामुळे पुणेकर विचारतात पुण्याच्या खड्डयांना डॉ कधी भेटणार ? 
●  पुणेकरांच्या प्रतिक्रिया 
-------------------------------
◆ मी रिक्षा चालक असून शहरातील खड्डे चुकविताना अक्षरशः माझी सर्कस होते 
- शिवराज निवदेकर ( रिक्षा चालक ) 

◆ पुणे सह्याद्रीच्या कुशीत आहे असे म्हणायचे पण आता पुणे खड्ड्यांच्या मुठीत आहे असे म्हणावे लागेल - युवराज पारीख ( सामाजिक कार्यकर्ता )

◆ पुण्यात आता रस्त्यावरून चालणे अवघड झाले आहे पदोपदी खड्डे दिसत आहेत -  सोहिनी डांगे ( सामाजिक कार्यकर्त्या )

Comments

Popular posts from this blog

पुण्याचा विकास पर्यावरण दृष्टीने सकारात्मक व्हावा - मा पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे .

विजयादशमीच्या शुभमुहूर्तावर पाक्षिक पर्यावरणनिर्णय वृत्तपत्रचे उदघाटन .....

MTDC च्या माध्यमातून पर्यटकांसाठी दिवाळीनिमित्त अनोखी पर्वणी ...